Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गटारी नव्हे तर काय आहे खरे नाव ? श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये कारण वाचा ......

 


श्रावण महिन्यात मांसाहार करू नये कारण....






गटारी नाही तर गताहरी म्हना। श्रावण मास सुरू होत आहे।  

 

होय, माहिती करून घ्या भारतीय लोकांच्या अज्ञानामुळे भरकटलेले वैज्ञानिक महत्व.

श्रावणात मांसाहार करू नये कारण....



           आपल्या सर्व हिंदू सणांना बदनाम करण्याचे सर्वात जास्त काम कोण करत असेल तर ते म्हणजे आपणच हिंदू लोक. भारतीय सण हे हिंदू धर्माच्या पावित्र्याचे अधिष्ठान आहे. श्रावण महिना म्हटलं म्हणजे काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या म्हणजे पावसाच्या श्रावण सरी गटारी आमावस्या हे होय. पण गटारी नव्हे तर गताहरी हे अनेकांना माहिती नाही. 

                आज आपण हेच माहिती करून घेणार आहोत. दरवर्षी श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर दोन गोष्टी नक्कीच आठवतात, एक म्हणजे श्रावण 'मासी हर्ष मानसी' हे एक गीत आणि दुसरं म्हणजे मांसाहारी लोकांची आवडती 'गटारी अमावस्या' भरपूर प्रमाणात मांसाहार करायचा आणि मद्यपान करायचे. मांसाहार, मद्यपान आणि गटारी यांचा परस्पर काही संबंध आहे की नाही याची सामान्य माणसाला काहीं माहिती नसते. 

       गटारी अमावस्येचे खरे नाव 'गताहरी' असे आहे, तर गताहार हा शब्द गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. 


श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? 



कारण …. श्रावण महिन्यात मांसाहार करायचा नाही हे मोठ्यांनी आपणाला सांगितलेले आहे आणि आपण ते ऐकलं  आणि त्यानुसार इतरांनाही आपली हिंदी संस्कृती आणि परंपरा सांगत आपण ती पुढे चालू ठेवलेली आहे. मात्र श्रावण महिन्यात मांसाहार करत नाही, हे तुम्हाला माहित आहे का? हिंदुस्थान मध्येचालणाऱ्या अनेक प्रथा आणि परंपरा यांना शास्त्रीय कारण असतं हे आपण अजिबात विसरून चालणार नाही.



स्वर्ग मंडप असलेले १०८ खांबी कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर या गावी वसलेले महादेवाचे एक प्राचीन मंदिर - वाचा



असंच एक महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे, ज्यामुळे श्रावणात माणसात वर्ज्य असतो. या दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचन क्षमता कमी झालेले असते. थोडक्यात सांगणे असे झाले की तर शरीराला साधे अन्न खाणे पचवण्यात सुद्धा कठीण असतं. महत्त्वाचे म्हणजे मांसाहार पचविण्यास मुळातच कठीण असतं. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार करणे योग्य नसत, असं आपल्या वाढ वडिलांनी आपल्याला सांगितलेलं असतं परंतु आपलं नेहमीच त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष होत असतं. तर काही लोकं हे सातत्याने पाळत आलेले आहेत.


वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये किंवा राज्यांमध्ये तेथील वेगवेगळ्या भाषांमध्ये गताहरीला वेगवेगळी नाव देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे संबोधने प्रदेशानुसार वेगवेगळे असू शकते.



महाराष्ट्र मध्ये गत हारी तर गुजरातमध्ये आणि उत्तर भारतातील काही राज्यात आषाढी अमावस्याला हरियाली अमावस्या असे म्हणतात. तर दक्षिणेतील राज्यात या दिवसाला सुखला अमावस्या असे म्हटले जाते.


महाराष्ट्रात दीप दीप पूजनाला 

महाराष्ट्रात गताहरी (गटारी) अमावस्या म्हणजे मांसाहारी (नॉनव्हेज)  वर ताव मारणे एवढेच माहीत असतं. पण या दिवशी महाराष्ट्रातील दीप पूजनाला अन्याय साधारण महत्व आहे. महाराष्ट्रात गटारी अमावसेला दिप अमावस्या असेही म्हटले जाते.


आपल्या हिंदू धर्मातील सण आणि संस्कृतीची जाण ठेवावी. त्यामुळे कृपया आपल्या धार्मिक परंपरा, सण  आणि उत्सव यांना आपणच बदनाम करू नये. आणि जाणीवपूर्वक अपभ्रंश हॉट आहे तो थांबवू या, ही विनंती आहे. 






Post a Comment

0 Comments

close