भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेलले असतात. या नकाशाच्या आधारे जमिनीचा हद्दी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे नकाशे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात.
शासनाचा ई नकाशा प्रकल्प आहे तरी काय?
पण हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच १८८० पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी नकाशा हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेला आहे. त्यानुसार त्यावर सध्या काम काय चालू आहे. काही ठिकाणी तो पूर्ण झालेला आहे. तर काही ठिकाणी तो अपूर्ण स्थितीत आहे.
तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे, फाळणी बारा इत्यादी नकाशांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. त्यामुळे डिजिटल सातबारा यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशा ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. याच पद्धतीला महाराष्ट्र शासनाने ई नकाशा प्रकल्प हे नाव दिलेले आहे.
त्यामुळे शासनाच्या नकाशा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना घरबसल्या आपल्या जमिनीचे संपूर्ण नकाशे पूर्ण माहिती सह पहावयाला आणि त्याचं अवलोकन करायला उपलब्ध होत आहेत. त्याच प्रमाणे त्या नकाशांच्या छायांकित प्रती अर्थात प्रिंट सुद्धा आपणाला डाऊनलोड करून घेता येत आहे. तसेच आपल्या लगतच्या शेतकऱ्यांची सुद्धा माहिती आणि त्यांचे नकाशे ऑनलाइन ई नकाशा प्रकल्पात उपलब्ध होत आहे. त्यामुळे भविष्यातील वाद-विवाद दावे-प्रतिदावे हे कमी होऊन शासन आणि प्रशासन लोकाभिमुख होऊन अधिक कार्यरत होईल. आणि शेतकऱ्यांना नागरिकांना चांगली दर्जेदार सुविधा या अशा प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. हे शासनाचे महत्त्वाचे धोरण आणि लक्ष आहे.
हे पण वाचा - शेतात जाण्यासाठी रस्ता मागणी अर्ज नेमका कसा करायचा?
शेतात जाण्यासाठी रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घेऊन त्या हद्दी कायम करायचे असतील तर शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा नकाशा असणे अत्यावश्यक असते. असा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा हे आपण आज पाहणार आहोत. आता सरकारने सात-बारा आणि आठ अ उतारा सोबत जमिनीचा नकाशा सुद्धा शासनाने ऑनलाइन उपलब्ध करून दिलेला आहे.
हे पण वाचा - शेत जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा पहायचा ?
ई नकाशा प्रकल्प या प्रकल्पाची माहिती तुम्हाला समजली असेल आणि ऑनलाईन शेत जमिनीचा नकाशा कसा काढायचा हे तुम्हाला वरील लिंक नुसार समजले असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आमचा लेख तुम्हाला कसा वाटला.
धन्यवाद....
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH