जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा पहायचा
शेतात जाण्यासाठी रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घेऊन त्या हद्दी कायम करायचे असतील तर शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा नकाशा असणे अत्यावश्यक असते. असा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा हे आपण आज पाहणार आहोत. आता सरकारने सात-बारा आणि आठ अ उतारा सोबत जमिनीचा नकाशा सुद्धा शासनाने ऑनलाइन उपलब्ध करून दिलेला आहे. याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आज आपण गावाचा आणि शेत जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा काढायचा आणि तो ऑनलाइन कसा वाचायचा त्याचप्रमाणे सरकार चा ई नकाशा हा प्रकल्प नक्की काय आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जमिनीचा नकाशा अचूक कसा पहायचा?
तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाइन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल सर्च इंजिन वर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं टाईप करुन सर्च करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडले जाईल.
आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया.
या पेजवर डाव्या बाजूला लोकेशन हा रखना दिसेल.या रकाण्यात तुम्हाला तुमचं राज्य कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर हा पर्याय निवडायचा आहे. आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडताना तुम्ही नक्की कोणत्या भागात राहतात. त्यानुसार तुम्हाला तो ऑप्शन किंवा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप Village Map या वर क्लिक करून पाहायचे आहे.
त्यानंतर तुमची स्वतःची शेतजमीन ज्या गावात येते त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर उघडला जातो. होम (Home) या पर्याय समोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता. त्यानंतर डावीकडील प्लस (+) किंवा मायनस (-) या बटनावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. म्हणजेच झूम इन किंवा झुम आउट करता येते. पुढे डावीकडे यातील एका खाली एक आडवे रेषा दिसतात. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर परत जायला मिळते.
आता आपण जमिनीचा नकाशा कशाप्रकारे काढायचा ते पाहणार आहोत
या पेजवर सर्च बाय प्लॉट नंबर ( Surch By Plot Number ) या नावाने रकाना असेल. इथे तुम्हाला तुमच्या सातबारा उतारा गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
होम या पर्याय समोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकी (-) ते बटन दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
आता डावीकडील प्लॉटिंग इन्फो (ploting Info) या रकान्या खाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशे जमीन कोणाच्या नावावर आहे. त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, सविस्तर माहिती दिलेली असते. एका गट क्रमांक ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती येथे दिलेली असते.
ही माहिती पाहून झाले की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट ( Map Riport ) चा पर्याय असतो. यावर क्लिक केले की तुमच्या जमिनीचा रिपोर्ट तुमच्यासमोर उघडला जातो.
त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या डाऊन वर्ड ( Dowenward Arrow ) क्लिक केले की तो तुम्ही डाऊनलोड करू शकता. त्याखाली तुमच्या गटाला लागून असल्याचे जमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात.
आणि मग तर खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याचा नावावर किती जमीन आहे. याची सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली असते.
हे पण वाचा - शेतात जाण्यासाठी रस्ता मागणी अर्ज नेमका कसा करायचा?
शासनाचा प्रकल्प आहे तरी काय?
भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेलले असतात. या नकाशाच्या आधारे जमिनीचा हद्दी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे नकाशे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात.
हे पण वाचा - शासनाचा ई नकाशा प्रकल्प आहे तरी काय?
पण हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच १८८० पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी नकाशा हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेला आहे. त्यानुसार त्यावर सध्या काम काय चालू आहे. काही ठिकाणी तो पूर्ण झालेला आहे. तर काही ठिकाणी तो अपूर्ण स्थितीत आहे. याअंतर्गत तालुकास्तरावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे, फाळणी बारा इत्यादी नकाशांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. त्यामुळे डिजिटल सातबारा यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशा ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. याच पद्धतीला महाराष्ट्र शासनाने ई नकाशा प्रकल्प हे नाव दिलेले आहे. त्यामुळे शासनाच्या नकाशा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना घरबसल्या आपल्या जमिनीचे संपूर्ण नकाशे पूर्ण माहिती सह पहावयाला आणि त्याचं अवलोकन करायला उपलब्ध होत आहेत. त्याच प्रमाणे त्या नकाशांच्या छायांकित प्रती अर्थात प्रिंट सुद्धा आपणाला डाऊनलोड करून घेता येत आहे. तसेच आपल्या लगतच्या शेतकऱ्यांची सुद्धा माहिती आणि त्यांचे नकाशे ऑनलाइन ई नकाशा प्रकल्पात उपलब्ध होत आहे. त्यामुळे भविष्यातील वाद-विवाद दावे-प्रतिदावे हे कमी होऊन शासन आणि प्रशासन लोकाभिमुख होऊन अधिक कार्यरत होईल. आणि शेतकऱ्यांना नागरिकांना चांगली दर्जेदार सुविधा या अशा प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. हे शासनाचे महत्त्वाचे धोरण आणि लक्ष आहे. या प्रकल्पाची माहिती तुम्हाला समजली असेल आणि ऑनलाईन शेत जमिनीचा नकाशा कसा काढायचा हे तुम्हाला समजले असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आमचा लेख तुम्हाला कसा वाटला.
धन्यवाद....
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH