Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा परिषद शाळा वसेवाडी (सणसवाडी) ठरणार राज्यासाठी 'आदर्श मॉडेल स्कूल' : मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) गजानन पाटील



जिल्हा परिषद शाळा वसेवाडी (सणसवाडी) ठरणार राज्यासाठी 'आदर्श मॉडेल स्कूल' : मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) गजानन पाटील 




Zilla Parishad School Vasewadi (Sanaswadi) will become an 'ideal model school' for the state: Chief Executive Officer (CEO) Gajanan Patil


मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) गजानन पाटील यांचे आश्वासन :  ११ वी विज्ञान शाखा सुरू करण्याची घोषणा


सणसवाडी (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी (CEO) श्री. गजानन पाटील साहेबयांनी आज दि. २२ मे २०२६ शाळा भेट दौऱ्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी (सणसवाडी, ता. शिरूर) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेची गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. तसेच, वसेवाडी शाळेला राज्यासाठी एक 'आदर्श मॉडेल स्कूल' म्हणून विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

पहिल्याच बॅचचा निकाल १००% लागल्याने कौतुक : वसेवाडी शाळेच्या पहिल्याच बॅचचा दहावीचा निकाल १००% लागल्याबद्दल सीईओ गजानन पाटील यांनी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. संपूर्ण शाळेची पाहणी केल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या नवीन वर्गखोल्या आणि इतर भौतिक सुविधा तातडीने पुरविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

११ वी विज्ञान शाखा सुरू होणार, तज्ज्ञ शिक्षक अन् प्रयोगशाळा मिळणार : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम संधी मिळावी यासाठी साहेबांनी वसेवाडी शाळेत इयत्ता अकरावी विज्ञान (Science) शाखा सुरू करण्याचे निर्देश दिले. या वर्गासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ शिक्षक आणि एक सुसज्ज, प्रशस्त प्रयोगशाळा (Lab) जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली. ग्रंथभेट देऊन पाटील साहेबांचा सन्मान : कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडीच्या वतीने मुख्याध्यापक श्री. संतोष गोसावी यांच्या हस्ते मुख्यकार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेबांचा 'पुस्तक' देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.





मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती :

या महत्त्वपूर्ण दौऱ्याप्रसंगी अनेक राजकीय आणि प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते. 

सौ. मोनिका हरगुडे (सदस्या, जिल्हा परिषद पुणे व सदस्या, स्थायी समिती पुणे)
श्री. रामभाऊ सासवडे (उपसभापती, पंचायत समिती शिरूर)
सौ. कोमल ढेरंगे (सदस्या, पंचायत समिती शिरूर)
श्री. महेश डोके साहेब (गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरूर)
डॉ. प्रीतम कोकणे साहेब (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरूर)
श्री. बाळकृष्ण कळमकर व श्री. खोडदे साहेब (विस्तार अधिकारी, शिरूर)
सौ. शशिकला सातपुते (सरपंच, सणसवाडी) आणि
डॉ. मोहन नाना हरगुडे (उपसरपंच, सणसवाडी)
ॲड. श्री. विजयराज दरेकर (माजी उपसरपंच, सणसवाडी व माजी अध्यक्ष, रांजणगाव देवस्थान ट्रस्ट)

                     याप्रसोबतच, शाळा व्यवस्थापन समिती वसेवाडीचे अध्यक्ष श्री. गणेश बाळासाहेब दरेकर, माजी अध्यक्ष श्री. अमोल काळाराम हरगुडे, समिती सदस्य श्री. गणेश भगवान हरगुडे, श्री. महेंद्र हरिभाऊ दरेकर, सौ. संगीता नागरगोजे, सौ. पवळे, सौ. चिंचोलकर, सौ. सोनाली पवार, सौ. स्वरांजली यादव आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"वसेवाडी शाळेने गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील ही शाळा राज्यासाठी पथदर्शक ठरेल अशा रीतीने सर्व सुविधा पुरवण्यास जिल्हा परिषद कटिबद्ध आहे."
श्री. गजानन पाटील, CEO, जिल्हा परिषद पुणे.











Post a Comment

0 Comments

close