Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खर्च करण्याची ऐपत नाही म्हणून काय झालं मोफत वकील मिळवा आणि कोर्टात लढा द्या

  


खर्च करण्याची ऐपत नाही म्हणून काय झालं मोफत वकील मिळवा आणि कोर्टात लढा द्या





सामान्य माणसाच्या खिशामध्ये पैसा नसतो. परंतु अनेक गर्भ श्रीमंत लोक पैसा बाळगून असतात. त्यामुळे सामान्य माणसांना जर कायदेशीर अडचणी आल्या आणि धन दांडग्यांनी जर कायद्याच्या जोरावर आणि पैशाच्या बळावर वकिलांची फौज उभी केली तर गरिबांना कोर्टात सुद्धा उभ राहणं अवघड होते. कोर्टात मोठ मोठे वकील देण्यासाठी पैसे नसतात. ही गोष्ट महत्त्वाची असून गरिबांना कोर्टात जाण्यासाठी स्वतःचा रोजगार बुडवून शेतामधील कामे सोडून कोर्टात जावं लागतं. आणि कोर्टात जाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च सुद्धा त्यांच्याकडे नसतो. अशा वेळी काय करावे? आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की मोफत वकील कसा मिळवायचा असतो.



हायलाईट्स 


खिशात पैसा नसेल तर ? 

कोणत्या विषयांसाठी मोफत वकील मिळतो,

कोणाला मिळतो मोफत वकील,

मोफत वकिलासाठी कोठे अर्ज कराल?




खिशात पैसा नसेल तर ? 

खिशात पैसा असेल तर न्यायालयात जावे असे पूर्वी लोक म्हणत असत. पण याचा अर्थ गरिबांनी न्यायापासून वंचित रहावे असा होत नाही. पैसे नाहीत म्हणून न्यायापासून कोणी गरीब वंचित राहू शकत नाही किंवा राहू नये. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून सरकारी खर्चाने वकील दिला जात आहे. यंदा जानेवारी २०२२ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत विधी सेवा प्राधिकरणाने २०१४ गरीब आणि दुर्लक्षित लोकांना वकिलांची सेवा मोफत उपलब्ध करून दिलेली आहे.




वाहतूक नियम | Tdaffic Rules : ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? अधिक वाचा




कोणत्या विषयांसाठी मोफत वकील मिळतो

● कोणत्याही न्यायालयीन कार्यवाही संबंधित,

● मूळ वाद पत्राचा दाव्याचा मसुदा तयार करणे,

● किरकोळ अर्जाचा मसुदा तयार करणे,

● जामीन अर्जाचा मसुदा तयार करणे.



कोणाला मिळतो मोफत वकील


● अनुसूचित जाती व जमातीतील व्यक्ती,

● अवैद मानवी व्यापारातील बळी किंवा भिकारी,

● स्त्रिया अथवा बालके,

● अपंग व्यक्ती ज्या व्यक्ती अंधत्व, कुष्ठरोग, बहीरेपणा, मानसिक रुग्ण,

● सार्वत्रिक आपत्ती, जातीय हिंसाचार, जातीय अत्याचार, पूर, दुष्काळ,

भूकंप किंवा औद्योगिक आपत्तींचे बळी,

● ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असेल अशा व्यक्ती,

● पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असलेली व्यक्ती आणि मानसिक

रुग्ण.




गरीब दुःखीत आणि वंचित लोकांना मोफत न्याय देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य ध्येय आहे. असे मुंबई शहर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख यांनी मत व्यक्त केलेले आहे.




मोफत वकिलासाठी कोठे अर्ज कराल?


१) संक्षिप्त स्वरूपात तक्रार किंवा सहायता प्राप्त करण्याचे कारण नमूद

करून एक लिखित स्वरूपात अर्ज दाखल करावा.

२) जर अर्जदार अशिक्षित असेल तर प्राधिकरण समितीचे सदस्य सचिव

किंवा अधिकारी त्यांचे तोंडी निवेदन नोंदवून घेतील आणि नोंदविलेल्या

निवेदनावर अर्जदाराचे सही किंवा अंगठ्याचा ठसा घेतील.

३) अर्जदारास विधी सेवा प्राधिकरण समितीकडे विनाशुल्क उपलब्ध

असलेल्या एका विहित नमुन्यात शपथपत्र जोडून द्यावे लागेल.

४) शपथपत्राद्वारे अर्जदाराची विधी सहाय्य प्राप्त करण्यासंबंधी निकष

तपासून घेता येईल.

५) विधी सेवा प्राधिकरण समितीचे सदस्य सचिव अर्जदाराची त्याने

शपथपत्रांमध्ये सांगितलेल्या तथ्यांचे पाळताळणी करण्यासाठी तपासणी

सुद्धा करू शकतात.



अशा प्रकारे मोफत वकीलाची सेवा तुम्ही वरील कारणासाठी प्राप्त करू शकत आहेत. परंतु योग्य ठिकाणी योग्य वेळी सहायता प्राप्त केली, तर प्रलंबित असलेल्या दाव्याला योग्य तो न्याय मिळतो.


 








Post a Comment

0 Comments

close