Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोणाच्या नावावर किती जमीन आहे ? पहा आता आपल्या मोबाईलवर




कोणाच्या नावावर किती जमीन आहे ? पहा आता आपल्या मोबाईलवर




जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करताना आपण जी जमीन खरेदी करत आहोत. आपणाला त्या जमिनीची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा जमीन खरेदी विक्री करताना खरेदी करणाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक होत असते. अनेक वेळा जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून आणि खोटी ओळखपत्रे तयार करून जमिनीची विक्री केली जाते. अशावेळी खरेदी करणाराची मोठी आर्थिक फसवणूक होत असते. 

कोणत्याही प्रकारच्या जमिनी संदर्भात खरेदी विक्रीचे व्यवहार करावयाचा झाल्यास, जमीन कोणाच्या नावावर आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरते. त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास पाहायचा म्हणजेच लँड रेकॉर्ड पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता हा इतिहास पाहायचा म्हणजे नेमकं काय करावे लागेल?  तर ती जमीन नक्की कोणाच्या नावावर होती? किंवा सध्या ती जमीन कोणाच्या नावावर आहे?  हे पाहणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत राहतात किंवा होत गेले आहेत. याची सविस्तर माहिती आपणाला अर्थात जमीन खरेदी करणाऱ्याला असणे आवश्यक आहे. ही माहिती आपल्याला कोणत्या कार्यालयात मिळू शकते? तर ती माहिती तहसीलदार कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. 


EWS (ई डब्ल्यू एस) आरक्षणाचा फायदा कोणाला मिळणार आहे ?प्रमाणपत्र कसे मिळवाल जाणून घ्या सविस्तर माहिती वाचा


जमिनी संदर्भात ७/१२ उतारा, ८-अ खाते उतारा, फेरफार हे त्या जमिनीच्या पत्रिकांमध्ये नमूद केलेले असतात. आता जमिनीची माहिती महाराष्ट्र सरकारने सर्व नागरिकांसाठी ऑनलाईन देण्याचं काम सुरू केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ई - अभिलेख या प्रकल्पांतर्गत ऑनलाइन कार्यप्रणाली चालू केलेली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 30 कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व जमिनीचे फेरफार उतारे, ७/१२ उतारे, ८ -अ उतारे आणि त्या जमिनीचे नकाशे हे महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन ( Online ) उपलब्ध करून दिलेले आहे. 

आता हे उतारे कसे पाहायचे? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 


मराठा तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज १० लाख ते ५० लाखापर्यंत अधिक महितसाठी येथे क्लिक करा.


तुमच्या किंवा गावातील इतर कोणाच्या जमिनीचे फेरफार, ७/१२ उतारे,८ -अ उतारे आणि नकाशे पहायचे असेल किंवा जमिनीच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला भू अभिलेख या सरकारी वेबसाईटवर ती उपलब्ध करून दिलेली आहे. आतापर्यंत जमिनीचा अधिकार किंवा जो अभिलेख असतो, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे. त्यातील कोणती नावे कमी झालेले आहेत किंवा कोणती नावे नव्याने समाविष्ट झालेली आहेत. आपणाला याच्या सर्व सविस्तर नोंदी आणि माहिती आपल्याला समजणे गरजेचे आहे. 


कोणाच्या नावावर किती जमीन आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


तसेच या पद्धतीने तुम्ही ७/१२ उतारा, ८- अ उतारा आणि जुने फेरफार पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकत आहे. तसेच ७/१२ उतारा, फेरफार, ८ -अ उतारा आणि जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला संबंधित व्यक्तीचे नाव आडनाव किंवा त्या जमिनीचा गट नंबर नमूद करून सर्च करणे आवश्यक आहे.


तत्पूर्वी तुम्ही तुमचा विभाग, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, त्यानंतर तुमचं गाव हे त्या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर गाव, नाव किंवा गट नंबरची माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माहिती उपलब्ध होऊ शकेल. त्यामध्ये तुम्हाला समजेल की आपल्या नावे किती जमीन आहे. तसेच आपले नातेवाईक, शेजारी, गावातील अन्य व्यक्ती किंवा इतर व्यक्ती यांच्या नावे किती जमीन आहे हे पाहू शकत आहे.



१८५० पासूनचे जून ७/१२ उत्सरे,फेरफार आणि खाते उतारे पाहण्यासाठी येथे क्लिक करा


कोणाच्याही जमिनीचा नकाशा मोबाईलवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा










Post a Comment

0 Comments

close