Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

धारकरी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण गुरुवर्य श्री. संभाजी भिडे गुरुजींशी प्रत्यक्ष संवाद आणि आशीर्वाद

  

धारकरी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण गुरुवर्य श्री. संभाजी भिडे गुरुजींशी प्रत्यक्ष संवाद आणि आशीर्वाद





आज दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी धारकरी अनिल दादा बंने जत, सांगली आणि श्री. प्रमोद दादा जाधव सांगली तसेच श्री. सागर दादा निमघरे सांगली हे गुरुजींच्या भेटीला गेले होते. त्यावेळी सहज चर्चा चालू असताना गुरुजींना एक फोन आला आणि त्यावेळी तिकडून एक व्यक्ती म्हणाली की माझ्या मुलाला कामाला लावा. तेंव्हा गुरुजी म्हणाले की तुमच्या मुलाला मला भेटायला पाठवून द्या.


सदर फोन बंद झाला आणि गुरुजी म्हणाले की आपल्या मुलांनी व्यवसाय सुरू करायला हवा तर हे नोकरीची मागणी करत आहेत?


बर ते जाऊद्या तुम्ही तर व्यवसाय करत असाल ना?

मग धारकरी श्री. अनिल दादा बंने आणि श्री. प्रमोद दादा जाधव यांनी आपण सर्वांनी मिळून श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी असणाऱ्या तरुणांच्यासाठी आर्थिक साक्षरता आणि उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रम -२०१७ पासून एकूण ३ प्रशिक्षण वर्ग राबविले होते त्याची पूर्ण माहिती दिली.

 गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींनी मला भ्रमणध्वनीवर संपर्क केला होता. आणि गुरुजींनी संवाद साधून मी आणि आपण सर्वजण एकत्रितपणे धारकरी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे, त्याबद्दल तोंड भरून कौतुक करून शाबासकीची थाप दिली आहे. 

 गुरुजी म्हणाले की अर्जुन दादा, आपण करत असलेलं काम अधिक जोमाने करावे. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती पितापुत्रांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हाती घेतलेल्या कार्यात नक्कीच यश मिळेल.


तसेच गुरुजी पुढे म्हणाले की आपण करत असलेले कार्य माझ्यापर्यंत पोहोचले आहे. आपले कार्य ऐकून मला आनंद वाटला. अर्जुन दादा मी आपणाला मोहिमेत भेटतो आणि अधिक बोलू या. 


तुम्ही मोहिमेत या आणि सर्वांना घेऊन या तत्पूर्वी तुम्ही कामाला लागा आणि शिरूर तालुक्यातील प्रत्येक गाव सामील करा. तसेच कधीपासून गडकोट मोहीम करत आहे? आणखी काय काय उपक्रम करत असता अशी विचारपूस केली आहे.


तब्बल १४ वर्षानंतर प्रत्यक्ष बोलणं : माझा आणि गुरुजींचा प्रत्यक्ष संवाद आणि भेट ही सण डिसेंबर २०१४ साली शिरूर शहरात सभेवेळी झाली होती. त्यावेळी गावातील माझे जवळचे मित्र आणि कामगार सहकारी श्री. बाळासाहेब मारुती दरेकर यांनी माझा आणि गुरुजींचा परिचय करून दिला होता.  गडकोट मोहीम करा म्हणून निमंत्रण दिले होते.  त्यानंतर पहिली गडकोट मोहिम ही श्री. वैराटगड वाई ते श्री. सप्तशृंगी गड (अजिंक्यतारा) सातारा हे केली होती. आजपर्यंत माझी गडकोट मोहीम चुकली नाही.


आपल्या देव, देश आणि धर्म कार्यात श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेत गुरुजी आपल्याला सर्वोच्च स्थानी आहेत. आज कामाचं चीज झालं आणि केलेलं कार्य गुरू चरणी अर्पण केलं आहे. 

आज धन्य जाहलो...


हे कार्य आपणा सर्वांमुळे शक्य झाले आहे, आणि आईवडील यांच्या शिकवणीतून आणि आशिर्वादातून निर्माण झाले आणि शक्य झाले आहे. तसेच घरातील सदस्य, भाऊ, पत्नी आणि मुले यांनी पण नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अशीच मदत असू द्या आणि कार्यास प्रेरणा देत जा.

सर्वांचे मनापासून धन्यवाद

श्री. अर्जुन लहानबा सैद

Post a Comment

1 Comments

POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH

close