Land Record : आता फक्त गट नंबर टाकून शेत जमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा पहा
शेतजमीनीचा नकाशा काढायचा म्हटलं की पूर्वी तहसील कार्यालयांमधील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन तो काढायला लागत होता. आणि त्या ठिकाणी अनेक चकरा मारूनही नकाशे वेळेवर मिळत नव्हते. नकाशा तिथे मिळवायचा म्हणजे खूप अवघड काम होते आणि आताही तीच परिस्थिती आहे. नागरिक या कामासाठी खूप खूप त्रासून जायचे. एखाद्या गटाचा नकाशे मिळवायला १५- १५ दिवस ते १ महिना कालावधी लागत असे. तसेच शेतकरी यांना स्वतःच्या गावातून तालुक्याला जायचं म्हटलं की वेळ आणि पैसा हा सुद्धा खर्च होत होता.
शेतात जाण्यासाठी नवा रस्ता बनवायचं असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असते. आता सरकारने सातबारा ( ७/१२ ) आणि आठ अ (८- अ ) उताऱ्या सोबत जमिनीचा नकाशा सुद्धा ऑनलाईन उपलब्ध केलेला आहे. आता आपण गावाचा आणि गट नकाशा कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढायचा असेल तर खालील पद्धतीने तुम्ही तो घरबसल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकत आहे. आणि त्या नकाशाची प्रिंट काढू शकत आहे. आता आम्ही दिलेल्या खालील लिंक जायचे आहे. त्या पेजवर क्लिक केल्यावर डाव्या बाजूला लोकेशन ( Location ) हा पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून तुमचं राज्य निवडायचे आहे. त्यानंतर कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे. आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा त्यानंतर तालुका आणि त्यासोबत गाव निवडाचे आहे. आणि सगळ्यात शेवटी विलेज मॅप यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येत आहे त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. होम (होम ) या पर्यायासमोरील आडव्या बाजूवर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये सुद्धा पाहू शकत आहे. त्यानंतर डावीकडील अधिक ( + ) किंवा वजा ( - ) या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. म्हणजेच झूम इन ( Zoom in ) किंवा झूम आऊट ( Zoom Out ) अशाप्रकारे ऑप्शन ( Option) निवडून तो पाहता येत आहे. पुढे डावीकडे ज्या तीन एकाखाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्या पेजवर परत जाऊ शकाल.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा हा मोबाईलवर ऑनलाइन काढून पाहू शकत आहात आणि डाऊनलोड ( Dowenload ) करू शकत आहेत.
1880 पासूनचे जुने ७/12 उतारे, 8 अ चे खाते उतारा आणि फेरफार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH