Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश अण्णा धसांवर निशाणा

Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे  पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश अण्णा धसांवर निशाणा









बीड  : Ajay Munde on Suresh Dhas  गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आमदार सुरेश धस आणि नंजय मुंडे यांचे बंधू अजय बंधू अजय मुंडे यांच्यासोबत कलगीतुरा रंगला आहे.


Ajay Munde on Suresh Dhas : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे (Santosh Deshmukh Murder Case) पाशवी दृश्य समोर आल्यानंतर धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर हल्लाबोल केला होता. यावरून धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे (Ajay Munde) यांनी सुरेश धस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत खोक्या प्रकरणात सुरेश धसांना सहआरोपी करा, असे म्हटले आहे. यावर सुरेश धस यांनी अजय मुंडे अजून लहान आहेत. धनंजय मुंडे यांनी याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावं, खोका-बोका-चोखा सगळे सापडतील, असे आव्हान दिले होते. आता अजय मुंडे यांनी सुरेश धस यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.


नुकतेच बीडमधील (Beed) एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेला आणि असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाई (Khokya Bhai) याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. सतीश भोसले (Satish Bhosale) याला बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी (Beed Police) एकत्रित पणे  ही कारवाई केलेली आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांना जवळचा कार्यकर्ता असल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. हाच धागा पकडत अजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय. 

Post a Comment

0 Comments

close