Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Bullock Cart Race | बैलगाडा शर्यत काय आहे ?





आपल्या आवडीचे आणि हक्काचं बैलगाडा शर्यतीचे you tube चॅनेल -



                                                                    बैलगाडा शर्यत

काय आहे बैलगाडा शर्यत?

बैलगाडा शर्यत हि खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, मावळ, शिरुर तालुक्यातील यात्रांचे वैभव आहे. शेतकरी घराण्याची परंपरा जपणारा हा एक मर्दानी खेळ आहे. ज्याला परंपरा आहे शंभराहुन अधिक वर्षाँची. बैलगाडा म्हणजे २० ते २५ किलो वजनाचा सांगाडा. बैलगाडा शर्यतीमध्ये गाड्यावर माणुस स्वार होत नाही, हा या शर्यतीचा नियम आहे. बैलगाडा धावण्यासाठी असलेली धावपट्टी /घाट याची लांबी १०० ते १५० मीटरच असते. बैलांना हा गाडा घाटातुन १०० मीटर पळवित न्यायचा असतो, पण गाड्यावर स्वार नसल्याने बैलांवर घाट पार करण्याची जबरदस्ती नसते. बैलगाडा या घाटातुन धावत असताना संयोजक या गाड्याचे सेकंद मोजतात आणि या सेकंदावर त्या बैलगाड्याचा क्रमांक ठरविला जातो. उदा.- १२ सेकंद पहिला, १३सेकंद दुसरा, १४सेकंद तिसरा क्रमांक याप्रमाणे क्रम ठरविला जातो. अशी आहे हि बैलगाडा शर्यत आणि तिचे स्वरुप असते.



                                                                  बैलगाडा शर्यत
कशी असतात शर्यतीची बैलं?

शर्यतीसाठी वापरली जाणारी बैल ही खिल्लारी जातीची पंढरपुरी, गावरान तसेच म्हैसुर जातीचीच असतात. बैलगाडा शर्यतींसाठीची बैलं ही खास या शर्यतींसाठीची पाळली जातात. ही बैलं शेतीच्या कामाला वापरली जात नाहीत, कारण शेत कामासाठीचा शांतपणा या शर्यतीँच्या बैलांमध्ये नसतो. शर्यतीची बैलं वर्षभर गोठ्यात बांधुन असतात. बैलांची ताकत चपळता आणि त्यांची पळण्याची क्षमता वाढावी म्हणुन या बैलांना गव्हाचे पीठ, पेंड, सरकी, मका, कडबा, वैरण, तेल, अंडी आणि हिरवा चारा अशा प्रकारच्या खाद्यांचा रतीब असतो. शर्यतीच्या वेळेसच गोठ्याबाहेर काढला जाणारा हा बैल आवरण्यासाठी पाच-सहा माणसांच माणुसबळ कामी येत. त्यासाठी या बैलांना दारु अथवा उत्तेजक द्रव्य पाजण्याची गरज नसते.

*बैलांच्या तोँडातुन येणारा फेस-

बैल, गाय आणि म्हैस या जनावरांच्या रवंथ या प्रक्रियेमुळे त्यांच्या तोँडाला कायमच फेस येत असतो. शिवाय या जनावरांच्या नाकात असलेल्या वेसणीमुळे ही जनावरे कायम आपल्या नाकपुड्या चाटत असतात त्यामुळे तोँडातला फेस बाहेर येत असतो.

*बैलांचा छळ केला जातो-

बैलांचा छळ केला जातो या विधानाबाबत आम्ही संभ्रमात आहोत. कोणत्या प्रकारचा छळ? धावपट्टीच्या सुरवातीला बैलं गाड्यास जुंपली जातात आणि ती मोकळी बैलं (ना कुणाचा धाक ना कुणाचा मार) धावपट्टीवरुन गाडा पळवीत नेतात, त्या गाड्यावर कोणीही मनुष्य स्वार नसतो. मग छळ म्हणजे तरी नक्की काय? अहो बैलगाडा पहिल्या नंबरात येणं हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे. त्या ठिकाणी बैलाला मारहाण करुन गाडा पहिल्या नंबरात येत नाही. तिथे बैल हा त्याच तोडीचा असणे गरजेचे असते. आणि जर बैल चांगला पळणारा नसेल तर तो बैल लगेच बदलुन त्या ठिकाणी नवीन बैल जुंपला जातो. कारण मारहाण करुन बैलाची पळण्याची क्षमता कोणीही वाढवु शकत नाही. म्हणुनच चांगल्या पळायला असलेल्या बैलांच्या किँमती आज आकाशाला भिडल्या आहेत. बैलगाडा पहिल्या नंबरात आणणारी चांगली बैलं ५ ते १० लाखांच्या किँमतीत विकली जातात. बैलांना मारुन जर बैलं जास्त पळायला लागली तर गाडामालक लाखो रुपये खर्च करुन बैलं विकत घेतील का?



                                                                  बैलगाडा शर्यत

*शेतकरी आणि बैलगाडामालकांची मन:स्थिती-

प्राणिमित्र संघटना आणि न्यायालय यांच्यामते बैलगाडा शर्यतीत बैलांचा छळ होतो-
वर लिहल्याप्रमाणे आपण सर्वाँनीच शर्यतीचे स्वरुप पाहिले आहे. मग छळ म्हणजे कोणता? कशा बाबतचा छळ? हा प्रश्न आमच्यासारख्या शेतकरी कुटुंबांना, बैलगाडामालक व शौकिनांना पडतो. आहो आम्ही शेतकरी बैलं पाळतो, पोटच्या पोरांप्रमाणे त्यांची देखभाल आणि सांभाळ करतो. बैलांना गव्हाच्या पीठाचा रतीब लावतो, पेँड, मका, कडबा(पेढा) असं महागडं खाद्य त्यांना खायला घालतो. गायीला गोरा(वासरु) झाले तर गाईच्या चार सडांपैकी तीन सडांचे दुध त्याला पाजतो आणि एका सडाचे दुध घरात वापरतो. (काहीँना सड म्हणजे काय ते माहीतचं नसेल) अहो जेवढे प्रेम आम्ही आमच्या बैलांवर करतो; तेवढं प्रेम कोणी घरातल्या माणसांवरही करत नाय. आजच्या युगात शहरात कित्येक प्रेतं लावारीस म्हणुन शवागृहात पडुन असतात. आजच्या काळात, पण आमी आमची प्रेमाची बैलं दावणीला मेला तर दुखवटा पाळुन बैलांचा दशक्रियाविधी, वर्षश्राद्ध घालतो, ते कशासाठी आम्ही छळ केला आणि बैल मेला म्हणुन? का आम्ही प्रेम केलं मुक्या जनावरावर आणि ते आम्हाला सोडुन गेलं म्हणुन?


                                                                    बैलगाडा शर्यत

-भेटल का या प्रश्नाचं ऊत्तर आम्हां #बैलगाडा मालकांना व गाडा शौकिनांना?
#सुपर_फायनल_सम्राट आणि #बैलगाडाशौकिन

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत: http://www.youtube.com/playlist…

Post a Comment

0 Comments

close