Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

औद्योगिक वीज जोडणी कशी मिळवयाची ?

                                                              औद्योगिक वीज जोडणी 




औद्योगिक वीज जोडणी मिळविण्यासाठी महत्त्वाचं :-

सोबतचा फॉर्म भरुन कागदपत्रे जोडावीत.....

१) एस एस आय दाखला,

२) ग्रामपंचायत ना हरकत दाखला,

३) जागा स्वतःची असेल तर शेतीचा ७/१२ व इमारतीचा ८ अ चा  उतारा जोडावा.

४) जागा मालकाचे १००/-रु.स्टॉंप पेपरवर संमतीपत्र ( तहसिलदार किंवा नोटरी समक्ष),

५) मतदान ओळखपत्र,आधार कार्ड,वाहन परवाना,पँन कार्ड,यापैकी एक आवश्यक आहे.

६) वायरमँन कडून जागेचा सर्वे तयार करुन घ्यावा.

७) विद्युत सुपरवायझर कडून विद्युत फिटींग अहवाल तयार करुन घ्यावा.

८) कँपीसिटरची खरेदी पावती जोडणे आवश्यक आहे. कँपीसिटमुळे पावर फँक्टर फायदा मिळतो. अन्यथा वीज बिला इतका दंड होतोच.

९) कँपीसिटर तपासणी अहवाल मा.कार्यकारी अभियंता कार्यालयात फक्त ५०/-रु.तपासणी फी भरुन मिळतो.

१०) प्रती हार्स पावर (HP) १०००/-रु.अनामत रक्कम भरावी लागते. जोडणी कायमस्वरूपी बंद करताना परत मिळते.

११) अतिरिक्त सेवा चार्ज म्हणून ३५००/-रु.आकार अनामत रक्कम बरोबरच भरावे लागतात.

१२) मा. सहाय्यक अभियंता यांना २० HP पर्यंत जोडणी भार मंजूर करण्याचे अधिकार असतात.

१३) मा.कार्यकारी अभियंता यांना २० HP च्या वरील जोडणी भार मंजूर करण्याचे अधिकार असतात.

१४) अर्जाच्या सर्व कागदपत्रांच्या चार प्रती तयार करुन सादर केल्यावर एकावर पोहोच आवश्यक घ्यावीच.

१५) सर्व कागदपत्रे पुर्ण असल्यावर अर्ज दाखल झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत जोडणी देणे बंधनकारक आहे.

१६) काही अडचण असेल, माहिती हवी असेल किंवा पैशांची मागणी केल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकारी किंवा मा.आयुक्त लाचलुचपत यांना लेखी,तोंडी तक्रार करावी.



      

Post a Comment

0 Comments

close