Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका मासिक बैठक ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र शिक्रापूर संपन्न : श्री. अशोक तुकाराम दरेकर

 


अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका मासिक बैठक ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र शिक्रापूर संपन्न  : श्री. अशोक तुकाराम दरेकर


 

सणसवाडी : बैठकीचा इतिवृत्तान्त 

नमस्कार, आज अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका मासिक बैठक ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र शिक्रापूर या ठिकाणी करण्यात आली, सर्वप्रथम स्वर्गीय संतोष बापू गांधी व भारत मातेचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बैठकीचे अध्यक्ष श्री संपत नाना फराटे होते.

बैठकीतील विषय 

1. श्री पोपट उकिरडे सहसचिव यांनी चिंचोली मोराची येथील उकिरडे मळ्यातील वहिवाटीचा जुना रस्ता शेजारील  व्यक्तींनी बंद केला होता,अडीच ते तीन वर्षे तहसीलदार यांच्याकडे केस चालून निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला, निकाल लागून सहा महिने झाले होते,निवडणुकीच्या कामकाजामुळे सदर रस्ता अजूनही खुला करण्यात आला नव्हता, ग्राहक पंचायत च्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, पोलीस निरीक्षक , मंडल अधिकारी मलठण यांना पत्र देण्यात आले व ग्राहक पंचायतीने 26 शेतकऱ्यांना सहकार्य करावे याबाबत अध्यक्ष यांचे नावे अर्ज त्यांनी दिला आहे, त्यांनी बैठकीत विषय सांगितला.

2. ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अशोक दरेकर यांनी पुणे नगर रोडवर दिशादर्शक फलक नव्हते ते लावले गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.

3. श्री अशोक मोरे उपाध्यक्ष हे पुणे जिल्हा येथील बैठकीसाठी उपस्थित होते त्यांनी बैठकीतील विषय म्हणून रथ सप्तमी व ग्राहक प्रबोधन सप्ताह आयोजित केला जाणार असल्याची माहिती दिली. 

4. श्री देवेंद्र सासवडे पुणे जिल्हा कार्यकारणी यांनी सांगितले की तालुका कार्यकारिणी प्रवास दौरा करावा व जुन्या नव्या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी व बैठक आयोजित करावी असे सुचवले. 

5. मा श्री धनंजय तात्या गायकवाड केंद्रीय कार्यकारी सदस्य यांनी कार्यकर्त्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले शिरूरला तालुक्याचे मासिक बैठक करून प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विषय घेऊन प्रत्येक कार्यालयाला पत्रव्यवहार करणे व पाठपुरावा करणे. दर महिन्यातील बैठकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहावे. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पत्रव्यवहार, ई-मेल, व्हाट्सअप ,फोन द्वारे नेहमी काम करत राहावे. तालुक्याचे माजी सचिव कै.संदेश कळमकर यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्याच्या वतीने रुपये पन्नास हजार रुपये मदत केली होती त्यापैकी सर्व कार्यकर्त्यांचे 42500  रुपये जमा झाले होते ,वरील 7500 श्री राहुल दिघे यांनी भरलेले आहेत. 

 21/ 12/ 24 रोजी स्वर्गीय संतोष बापू गांधी स्मृती पुरस्काराचा समारंभाचा खर्च रुपये दहा हजार करण्यात आला.

7. तालुका कार्यकारणी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात पत्र व्यवहार व प्रवास केल्यास त्यासाठी प्रवासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 

8. तसेच तालुका कार्यकारिणीने काम कसे करावे याची माहिती देण्यात आली. 

अध्यक्ष मीटिंग आयोजित करणे.

संघटक प्रवास करणे.

सचिव अंबलबजावणी करणे 

सहसचिव सचिवांना मदत करणे कोषाध्यक्ष बैठकीचा हिशोब ठेवणे 

सह कोषाध्यक्ष कोषाध्यक्षांना मदत करणे 

इतर कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांनी आपापल्या परीने अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेसाठी वाढण्यासाठी प्रयत्न करणे तसेच विविध विषय समित्या प्रमुखांनी आपणास दिलेल्या समितीचे एक विषय घेऊन काम पूर्ण करणे.

महिला अध्यक्ष महिलांचे संघटन बांधून संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे

असे अनेक विषय त्यांनी मार्गदर्शना मध्ये सांगितले. कार्यक्रमाच्या बैठकीचे आजचे चहा व पाणी श्री दत्तात्रय शिंदे गुरुजी यांनी केले व आजच्या बैठकीसाठी हार फुले रुपये 200खर्च आला. 

या बैठकीसाठी पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री तुकाराम बुवा फराटे व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका कार्यकारणी पदाधिकारी, कार्यकर्ते, विषय समित्या प्रमुख व शेतकरी उपस्थित होते.चहापाणी नंतर बैठक संपन्न झाली .

अशी माहिती श्री. अशोक तुकाराम दरेकर यांनी आमच्या प्रतिनिधी यांना दिली आहे ..


Post a Comment

0 Comments

close