Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वृध्दाश्रम ही संकल्पना जेव्हा भारतासारख्या पुण्याभुतून नष्ट ? पिकलं पान - शार्दूल भेगडे पुणे




वृध्दाश्रम ही संकल्पना जेव्हा भारतासारख्या पुण्याभुतून नष्ट ? पिकलं पान..!





आज जवळच्या मित्रांसोबत नववर्षानिमित्त पहिला दिवस साजरा करायला नवरत्न ओल्ड एज होम या सौ.अनिता राकडे मॅडम यांच्या वृध्दाश्रमात गेलो होतो. सर्व आजी आणि आजोबांची व्यवस्था अतिशय नीटनेटकी आणि स्वच्छ आहे. सर्वांचं एकमेकांमध्ये खेळीमेळीच वातावरण होते. एका आजीसोबत बोलत होतो त्यांचं वय होत साधारण ९४ होते. पण अस कोणी बोलायला आल की त्यांचे आश्रु दाटून येत होते. आजी म्हटल्या 'घरातले विचारात नाहीत; भेटायला येत नाहीत. तुम्ही कोण कुठले आमच्यासाठी आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. अगदी हिरहिरीने ते आजीआजोबा सर्वांशी बोलत होते. परंतू कुठेतरी अस वाटत होत की त्या हसण्यामागे हे आजी आजोबा खूप मोठं दुःख लपवत आहे.
एक आजोबा होते, त्यांना ४० हजार पेन्शन होती. काही रक्कम आश्रमाला देऊन बाकीचे पैसे ते हवे तसे खर्च करतात. म्हणजे शरीर चांगले सोबत पैसा पण होता, आपलेच लोक सांभाळायला कोणी तयार नव्हते. मतभेद असतात कधीकधी आजी आजोबाही बोलताना चुकतात परंतु त्यावर त्यांना कायमच दूर लोटणे हा उपाय नव्हे. तर थोड्या वेळाने का होईना सोबत बसून बोलून गैरसमज दूर करून त्यांच्याशी बोल पाहिजे. आपला माणूस सोबत आहे, समोर दिसतो आहे, तोवर त्याच्याशी आपण रुसवा, फुगवा, भांडणे सगळे करू शकतो. पण अचानक एकदा माणूस गेला की सगळ संपत आणि राहते फक्त खंत! त्या भाबड्या जीवाचे थोडे दिवस राहिलेले असतात. तो आयुष्याचा शेवटचा टप्पा आनंदात आणि आपल्या लोकांसोबत जावा हीच इच्छा बाळगून असतो.

एक आजोबा तर गडगंज गर्भश्रीमंती घरी असून मुलांनी घरातून हाकलून दिले म्हणून पुलाखाली भिकऱ्यासारखे ३ महिने राहिले होते. काही मिळेल तर खायचे नाहीतर पाणी पिऊन उपाशी दिवस काढत होते. अशा दयनीय अवस्थेत त्यांना आळंदी येथील एका संस्थेने स्वीकारले. आता ते आजोबा नित्य भजन करतात, देवाची पूजा करतात आणि सोबतच्या लोकांसोबत छान राहतात. त्यांना मात्र आता आपल्याच लोकांकडे जाण्याचा तिळमात्र मोह राहिला नाही.  मात्र जेव्हा याच आजोबांची प्रॉपर्टी विकायला सही लागेल. तेव्हा मात्र वास काढत कुत्र्यासारखे सगळे स्वार्थी नातेवाईक गोळा होतील हे नक्की आहे.

बेवारस आणि गरिबीमुळे हतबल किंवा अन्य काही कारणे असतीलच मी ती मान्य करतो. पण समाजातला सुशिक्षित आणि धनसंपन्न वर्ग जेव्हा ही जबाबदारी झिडकरतो तेव्हा त्यांचा राग येतो. ज्या आई वडिलांनी रक्तच पाणी करून आपलं भरणपोषण केलेळ असत, कमवायची अक्कल नव्हती तेव्हा सांभाळलं आणि कमवते होईपर्यंत पाठीशी सर्वोतोपरी उभे राहिले. आज त्याच आई वडिलांना यांनी वृध्दाआश्रम दाखवले हा प्रसंग पाहून हृदय पिळवटून टाकणाऱ्या वेदना होतात.

उतरत्या वयात जवळच्या माणसांचा सहवास आणि प्रेमाची गरज आजी आजोबांना असते. हाच सहवास आणि प्रेम देऊन मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते उभे करतात. परंतु त्याच्या बदल्यात त्यांना मात्र वृध्दाश्रम दाखवला जातो. प्रॉपर्टी, सत्ता, प्रतिष्ठा, पैसा आणि प्रसिद्धी या कलयुगतील प्रलोभनांच्या अती आहारी जाऊन मनुष्यजात कर्माचा सिद्धांत विसरतेआहे. आज जे तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईवडिलांच्या बरोबर वागत आहात अगदी अशीच तुमची मुले पण तुमच्या बरोबर वागतील.

जे पेराल तेच उगवेल!

आपल्या कुवतीप्रमाणे शक्य असेल ती मदत आपण समाजातील दुर्बल घटकांची केली पाहिजे. नाही मदत करणे शक्य तर जो करतो आहे त्याच्यासोबत उभ राहिले पाहिजे. वृध्दाश्रम ही संकल्पना जेव्हा भारतासारख्या पुण्याभुतून नष्ट होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि पारिवारिक जीवनाचा खरा आदर्श जगासमोर ठेवू शकतो.


शार्दूल भेगडे
९१६८७९५२२७

Post a Comment

0 Comments

close