सार्वजनिक डोहाळे जेवण....खेड्यातील गरीब गरजू गरोदर महिलांचे कौतुक!
शिरूर : शिरूर तालुक्यात ढोक सांगवी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने.
शिरूर तालुक्यात 19 जानेवारी 2025 रोजी ढोकसांगवी येथे मकरसंक्रांतीचे अवचित्य साधुन हळदी कुंकू आणि सामुदायीक डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अयोजित केला होता.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतने सुरू केलेल्या लज्जागौरी या मोहीमे अंतर्गत हे सार्वजनिक डोहाळे जेवण कार्यक्रम करताना सीझर रोखण्या करिता काय काय उपाय, व्यायाम करायला हवेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले गेले, तसेच सीझरमुळे महिलांचे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम याबाबत देखील उपस्थित गरोदर महिलांना मार्गदर्शन केले गेले.
आपली पारंपरिक नैसर्गिक प्रसूती पद्धती या विषयावर देखील उपस्थित महिलांना डॉक्टर अशोक काळे (संस्थापक सदस्य अ.भा.ग्रा.पंचायत) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व उपस्थित गरोदर महिलांची ओटी भरली, त्यांना दागिने घालून, फुलांचे हार घालून त्यांना उत्तम जेवण दिले, त्याचे डोहाळे कौतुक करण्यासाठी त्यांना शाळेतील मुलांनी बसवली असलेली गाणी, डान्सचा प्रोग्राम दाखवला आणि त्यांचे फोटो काढले गेले.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सविताताई काळे, PSI, रांजणगाव पोलीस स्टेशन व सौ स्वातीताई पाचुंदकर, मा. जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होत्या.
प्रमुख उद्घाटक यांनी उपस्थित महिला आणि इतरांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम व गुन्ह्याचे वाढते प्रमाण या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास गरोदर महिलांना कार्यक्रमास आणण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका- सौ.सुरेखाताई अभंग, सौ.आशाताई अभंग, सौ. वनिताताई अभंग आणि सौ.संगिताताई ठोकळ यानी ढोकसांगवी गावातील गरोदर महिलांची इत्यंभूत माहिती गोळा करून विशेष सहकार्य केले.
सौ नयनाताई आभाळे, महिला जिल्हा अध्यक्ष अ.भा.ग्रा.पंचायत, यांनी महिला संघटन तसेच आरोग्याची काळजी घेणे बाबत महिलांची फसवणूक रोखण्याकरता मार्गदर्शन केले.
ॲड श्री तुषार झेंडे पाटील, जिल्हा अध्यक्ष अ.भा.ग्रा.पंचायत यांनी ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता कायदेशीर मार्गदर्शन केले.
कुमारी कोमल बोरा यांनी ढोकसांगवीमधील वाडी-वस्ती येथील प्रत्येक महिलेला समक्ष भेटून त्या महिलांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. काही महिलांच्या मनामधील इच्छा जाणून त्यांचे डोहाळे पुरवणेसाठी हा कार्यक्रम स्वतः आयोजित केला होता.
यातील काही महिलांची परीस्थिती बेताची असल्याने त्यांनी मनातील इच्छा मनात दाबून ठेवल्या होत्या. या सर्व गोष्ठी समजल्यावर ग्राहक पंचायत कार्यकर्ती कू ॲड कोमल बोरा हिच्या लक्षात आले की अपल्या मातृशक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आणि मग डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक गरोदर महिला ही अपल्या घरातीलच ताई आहे असे समजून हा कार्यक्रम आयोजित केला. उपस्थित सर्व मातृशक्ती यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि समाधान पाहिल्यावर कोमल सह सर्व उपस्थित लोकांना एक आत्मिक समाधान मिळाले.
या कार्यक्रमानिमित्त गावांमध्ये काही महिला अशा भेटल्या कि त्यांचे लग्नाला 10-15 वर्ष झाले आहे. परंतु त्याना मूलबाळ होत नाही. या महिला समाजातील लोकांचे, घरातील काही लोकांच्या नजरा चुकवत आहेत आणि त्यांना मनातून अपराधी वाटत आहे. त्या स्त्रीया दररोज अंतरीक युद्ध एकटी लढत आहेत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी ठरवले कि प्रत्येक स्त्रीशक्तीचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता त्याचे संमवेत उभे राहायचे आणि ज्या महिलांना गेली 10-15 वर्षे मुल होत नाही. त्यांची आरोग्य तपासणी पुढील काही दिवसात आयोजित करायची आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा.
या कार्यक्रमास विशेष सहकार्य सौ गुणमाला धोका परिवार यानी केले.
कार्यक्रम खुप आनंदात आणि जल्लोषात संपन्न झाला आणि गरीब गरोदर महिलांचे कौतुक जल्लोषात केले गेले.
कार्यक्रमात श्री दिनेश धोका, श्री उमेश धोका आणि सौ पुष्पलता ओस्तवाल यानी मनोगत व्यक्त केले.
आभार- सौ पुष्पलता ओस्तवाल, मा. सरपंच कारेगाव ग्रामपंचायत यांनी मानले.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन कु. ॲड कोमल प्रशांत बोरा (महिला अध्यक्षा शिरूर तालुका अ.भा.ग्रा.पंचायत ) यानी केले.
सौ नयनाताई आभाळे
(महिला जिल्हा अध्यक्ष, अखील भारतीय
ग्राहक पंचायत)
9822744398
कु. ॲड कोमल प्रशांत बोरा,
(महिला अध्यक्षा शिरूर तालुका अ.भा.ग्रा.पंचायत)
99702 25651
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH