बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये देशमुख कुटुंबिय सहभागी झाले आहेत. या विराट मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत.
मला ज्यावेळी या प्रकरणात लोकांचा मोठा आक्रोश दिसत होता, मी त्याचवेळी २८ तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं, होतं असं संदीप क्षीरसागर म्हणाले. मी पहिल्यांदा वाल्मीक कराड याचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआरमध्ये सुद्धा वाल्मीक कराडचे नाव आहे, मग का नाही वाल्मीक कराडला अटक करत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही या घटनेचा कधीच राजकारण केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तातडीने या प्रकरणाचा तपास लावण्याची घोषणा केलेली आहे. हे राजकीय प्रकरण नाही, हे गुन्हेगारीचे प्रकरण आहे आणि या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये सर्व जातीचे लोक उद्या एकत्र येणार आहेत. आज 18 दिवस झाले आहेत या घटनेला वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही, माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही, असं संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH