Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कल्याण जवळील सोनावळे गावातील अद्भुत गणपती गडद लेणी







गणपती_गडद_लेणी
#ganpatigadadcaves



Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे



 कल्याण जवळील सोनावळे गावातील  अद्भुत गणपती गडद लेणी

पुर्वीच्या काळी ध्यानसाधनेसाठी, निवासस्थान म्हणून किंवा शत्रूच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी डोंगरदऱ्यात अगदी दुर्गम भागात गुंफा तयार करण्यात येत असे. त्यातीलच हि "गणपती गडद लेणी".गडद म्हणजे कातळात खोदलेल्या गुहा.


Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे


                               
                 सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे विकेंडला फक्त पावसाळ्यात निसर्ग रम्य वातावरण बघण्यासाठी बाहेर पडणार्यांची संख्या खूपच असते. त्यामुळे एखाद्या गड किल्ले, लेणी किंवा ऐतिहासिक ठिकाणी लोंढेच्या लोंढे आलेले असतात. त्यात ते ठिकाण आपल्या व्यवस्थित पहाता येत नाही. तरी पण शनिवारी मी Chetan JD Rasal आणि RaviNdra KesarKar यांनी या लेणी बघण्याचा विचार केला. अशा वेळी लवकर गेल्यावर जास्त गर्दी मिळत नाही. तरी रविंद्र आणि मी सकाळी सहा वाजता घणसोलीतून बाईकला किक मारून शिळफाटा रोडने कल्याणला निघालो वाटेत मध्ये चेतन भेटणार होता आणि कल्याण मुरबाड रोड असा आमचा प्रवास सुरु झाला. पावसाळी वातावरण असल्यामुळे रोडवरचा प्रवास पण सुखद होता. मुरबाड रोडवरून किंचितच या लेण्या दिसतात. मुरबाड पासून थोड पुढे उरमोळीगावचा फाटा लागतो तिथे उजवीकडे वळून धसई गावाच्या रोडने सोनावणे या गावी पोहोचलो. 

Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे


                           सोनावळे या गावातून लेण्यांकडे पायवाट जाते. गावात बाईक पार्क करून ग्रामस्थांकडून लेण्यांकडे जाणारी वाट समजून घेतली. वाट चांगली मळलेली आहे. त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता नाही. हे गावातील मुलांनी सांगितल्यामुळे वाटाड्याची गरज भासली नाही. गावातून या लेण्या स्पष्ट पणे दिसतात. या दोन तीन वर्षांत पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन लेण्याकडे जाणारा रस्ता वन विभागाच्या वतीने चांगला मोठा केला आहे. मध्ये जाळीदार कंपाऊंड करून प्रवेशव्दार करण्याचे काम चालू आहे. काही वर्षांत येथे चेकपोस्ट होऊन लेण्या बघण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाईल अशी व्यवस्था केलेली दिसते.


Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे



                   वाटेत तीन ओहोळ लागतात. जंगलातून जाणारी वाट आहे. अधूनमधून मध्ये लेण्यांचे दर्शन होते. तेव्हा उभ्या कातळात जाळीदार नक्षीकाम केलेल्याचे भासते.आजूबाजूने वाहणारे धबधब्यांचे आवाज आणि पक्षांचा किलबिलाट एकूण मन अगदी प्रसन्न होते. काही काळानंतर शेवटच्या टप्प्यात एकदम दमछाक करणारी वाट लागते. ती चढून आल्यावर आपण चार दालन असलेल्या पहिल्या लेण्याजवळ पोहोचतो. तेथूनच कपारीत कोरलेल्या लहान-मोठे १४ लेण्यांचा समुह लागतो. त्यांच्याच बाजुने सर्व लेण्या समुह बघण्यासाठी वाट आहे. मध्ये गणेश मंदिर असलेली लेणी सर्वात मोठी लेणी आहेत. सात आठ पायर्या चढून गेल्यावर गणेश मंदिरात प्रवेशव्दारातून प्रवेश करतो. गणरायाच्या तीन पुरातन मुर्ती आहेत, तर तीन मुर्ती गावातील ग्रामस्थांनी नव्याने ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्याबाजूला राम लक्ष्मण सीता आणि हनुमंताची मूर्ती आहेत. हे दालन सहा खांबावर उभे होते परंतू आता फक्त तीनच खांब उभे आहेत. ते पण शेवटच्या घटका मोजत आहेत. 



Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे



Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे




                   मधील दोन खांबांवर किर्तीमुख,भारवाघयक्ष कोरलेली आहेत. परंतु काळाच्या ओघात त्यांची खुप मोडतोड झाली आहे. तर त्या काहीच मुर्त्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तसेच दोन खोल्या आहेत. इतर लेण्यांमध्ये आसन व्यवस्थासाठी कट्टा बांधलेला दिसतोय. दरवाजा लावण्यासाठी खोबण्या आहेत. गणेश मंदिराच्या समोरून वरून येणारा धबधबा हे एक आकर्षण आहे. शेजारच्या नागझरी/आंब्याचे पाणी या बारमाही झऱ्यावरून पाण्याची पाइपलाइन आणून वनविभाग आणि सोनावळे ग्रामस्थांच्या सहकार्याने पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.



Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे



                  लेण्यांचा व्याप्ती बघता इथे खुप मोठ्याप्रमाणात राबता असावा हे लक्षात येते. परंतु आता प्रेमी युगुलांने सर्व लेण्यांमध्ये नावे लिहून विद्रूप करून ठेवले आहे, हे खरच दुर्दैव आहे. तसेच मंदिराच्या खांबांला दोर लाऊन काही महाभाग Rapling करतात. संपूर्ण परिसर अर्धातास फिरून होतो.लेणी बघून आलेल्या वाटेने परतीचा प्रवास सुरू केला.


Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे


                     सातव्या शतकात खोदलेल्या या भव्य लेण्यांद्वारे तत्कालीन संस्कृतीची ओळख होण्यास मोठा हातभार लागला. महाराष्ट्रातील बहुतेक लेण्या या बौद्ध कालीन आहे. त्या नंतर वेगवेगळ्या राजसत्तानी त्यांचा वापरकरून त्यांच्यात बदल केला. हि लेणी धाकोबा डोंगरत कोरलेल्या आहेत. भौगोलिक स्थान बघता समोर गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड आहेत. याच डोंगररांगेत नानेघाट, माळशेज घाट आणि जिवधनगड आहे. गोरखगडाचा वापर नाथ पंथांनी केला त्या वरील लेणी ही गणेश मंदिराच्या लेणींसारखी आहे. नानेघाटचा व्यापारी मार्गामुळे या लेण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असावा. १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची नोंद घेतली. सोनावळे गावात बाळु पवार 09307094445/ यांच्या कडे चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था केली जाते.

शैलेश ज्ञानदेव तुपे.


Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे



Image Secure By - शैलेश ज्ञानदेव तुपे




#दगडांचा_देशा_महाराष्ट्र_देशा
#भटकंती_सह्याद्रीची
#dream_adventureclub
#swarajachevaibhav
#marathas
#memoriesneverdie
#marathaempire #footprintofhistory #indiansculpture #MustacheLover #UnknownHistory #gypsysoul #trekdiaries #incradiblemaharashtra #maharashtratourism #fort #wonderlust #WesternGhats #friendsforever #india_undiscovered #trekking
#trekking_in_sahyadri
#ganpatigadadcaves

Post a Comment

1 Comments

POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH

close