Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संघटनमंत्री पदी हवेलीचे मा भानुदास सरडे यांची निवड

संघटनमंत्री पदी हवेलीचे मा. भानुदास सरडे यांची निवड 


अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यात ग्राहक पंचायत नेहमीच सविनय कायदे पालन करून आंदोलन करत असते. प्रामुख्याने टोलनाका आंदोलन, बेकायदेशीर मुद्रांक वसुली, रिलायन्स वायू वाहिनी, बेकायदेशीर वीज वसुली, शेअर्स घोटाळा, मंजुश्री एजेंशी घोटाळा, ससे पालन घोटाळा, महसूल अनागोंदी कारभार अशी लोकाभिमुख आणि ग्राहकाभिमुख आंदोलन करून जनतेच्या न्याय हक्कला वाचा फोडण्याचे काम ग्राहक पंचायत करत आलेली आहे. 



               मा. धनंजय गायकवाड सत्कार करताना

          अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पुणे जिल्हा ग्राहक संघटन मंत्री पदी मा. भानुदास सरडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या झालेल्या बैठकीमध्ये मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष मा. धनंजय गायकवाड यांनी भानुदास सरडे यांची नियुक्ती जाहीर होती. नियुक्ती नंतर मा. भानुदास सरडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आलेले आहे.  

        

          भानुदास सरडे हे सक्षम आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ देण्याचे कामात त्यांचा हातखंडा आहे. कधी मागार ठाव न आम्हा हा करारी बाणा अंगी बाळगून ते गेल्या पंचवीस वर्षापासून ग्राहक पंचायतीच्या कार्यामध्ये योगदान देत आहेत. भानुदास सरडे यांनी यापूर्वी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हवेली तालुका अध्यक्ष आणि पुणे जिल्हा कोषाध्यक्ष काम पाहिले आहे. 


          नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांशी सव्वाद साधून सर्व कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शासकीय निमशासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमच्याशी प्रतिनिधीशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले आहे. 


                        संघटन मंत्री - भानुदास सरडे

            आता सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे संघटनेची ध्येय धोरणे, जनहिताचे व्यापक निर्णय कार्यकर्ते आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर करण्यात येईल, पुढे असेही सरडे पुढे म्हणाले. 


Post a Comment

0 Comments

close