Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रिक्षाचालक ते एक मंत्री एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास आणि त्यांचे बंड ।देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार?



रिक्षाचालक ते एक मंत्री एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास आणि त्यांचे बंड


Devendra fadnavis and Eknath Shinde 


मुंबई ,२१ जून : राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी उघड उघड बंड पुकारल्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

                                   याचा फटका राज्यातील सरकारने बसू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षात असे बंड करण्याची ही पहिलीच वेळ नाही.  यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी मोठे बंड पुकारलं होतं.

एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी शिवसेनेला परवडणारे नाही. एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आमदारांचे मोठे समर्थन असल्याचे बोलले जात आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातून त्यांना मोठं पाठबळ मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातुन शिवसेना राज्यभर पसरली  जिल्ह्यात शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांची पकड आहे.


राज्यातील अनेक जिल्ह्याचे आमदार शिंदे यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने जाणून रिक्षाचालक ते मंत्री आणि शिवसेना पक्षाचे गटनेते असा मंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपली असे वाटत असताना  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या नात्याने सर्वाना एकसंघ करून घेऊन शिवसेना मजबूत केली. त्यामुळे २०१७ साली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच एक हाती सत्ता आली होती. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद आणि बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळन्यासाठी हातभार लागला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिंदे यांची मोठी भूमिका होती.


Devendra fadnavis and Eknath Shinde 

या सर्व कार्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले. आनंद दिघे यांच्या मृत्यू नंतर राजकारणात आलेले एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या मुळे प्रभावित होऊन १९८० च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तर त्याच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. तत्पूर्वी त्यांची किसन नगर येथे शाखा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती.


कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद हा सर्वांना माहितीच आहे एकनाथ शिंदे यांना सीमा आंदोलनात अटकझाली होती. १९९७ मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली होती २००१ मध्ये सभागृह नेतेपदी निवड झाली होती सलग तीन वर्षे पण त्यांनी ते सांभाळलं होतं.


सन २००४ मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा ते आमदार झालेले आहेत. तर त्यांची शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती सुद्धा त्यांची झाली होती. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी- पांचपाखाडी मतदारसंघातले पुन्हा आमदार झाले. २०१४ साली विधानसभेच्या हाट्रिक साठी त्यांनी बाजी मारली आहे. विधिमंडळ विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली होती. 


नॉटरिचेबल आमदार : आता आपण पाहू या नॉटरिचेबल आमदार एकनाथ शिंदे - कोपरी, अब्दुल सत्तार - सिल्लोड, औरंगाबाद, शंभूराज देसाई - पाटण, सातारा, संदीपान भुमरे - पैठण, औरंगाबाद, उदयसिंह राजपूत - कन्नड, औरंगाबाद, भरत गोगावले - महाड, रायगड, नितीन देशमुख - बाळापूर, अकोला, अनिल बाबर - खानापूर, आटपाडी, सांगली, विश्वनाथ भोईर - कल्याण, (पश्चिम) संजय गायकवाड - बुलढाणा, संजय रायमुलकर - मेहकर, महेश शिंदे - कोरेगाव, सातारा, शहाजी पाटील - सांगोला, सोलापूर, प्रकाश आबिटकर - राधानगरी, कोल्हापूर, संजय राठोड -  दिग्रस, यवतमाळ, ज्ञानराज चौगुले - उमरगा, उस्मानाबाद, तानाजी सावंत - परंडा, उस्मानाबाद संजय शिरसाट - औरंगाबाद, (पश्चिम) रमेश बोरनारे - वैजापूर, औरंगाबाद, सुहास कांदे - नांदगाव, नाशिक, बालाजी कल्याणकर - नांदेड, (उत्तर) एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची नावं वाचली तर लक्षात येईल की हे आमदार अपवाद सोडला तर नेहमी निवडून येणारे आहेत.


त्यामुळे शिंदे यांची बंडखोरी शिवसेनेच्या नेत्यांना परवडणारी नाही. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील शिवसेना बैठकीत एकनाथ शिंदे यांना मानसन्मानाने परत आणण्यासाठी प्रयत्नं सुरू आहेत. शिंदे यांना परत आणणार आहेत. मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षावर शिवसेनेची बैठक होत आहे. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित शिवसेना आमदार आणि खासदारांशी चर्चा केली आहे. 

आता भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भूमिका घेतील आणि मंत्री एकनाथ शिंदे पुढे काय निर्णय घेतील यावर महाराष्ट्र राज्य सरकारचे भविष्यात अवलंबून आहे. पाहू या शिंदे यांचे बंड पेल्यातील वादळ ठरते की सरकार कोसळते. 

Tag :- #शिवसेना_पक्षप्रमुख #Bjp #Shivsena #आमदार #राष्ट्रवादी_काँग्रेस #शरद_पवार #अजित_पवार #महाराष्ट्र #ब्रेकिंग_न्यूज #मराठी_बातम्या  #देवेंद्र_फडणवीस #अमित_शहा #नरेंद्र_मोदी


Post a Comment

1 Comments

  1. खूप छान माहिती दिलीत

    ReplyDelete

POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH

close