Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रक्षा बंधन विशेष सत्य घटना - डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत

रक्षा बंधन विशेष सत्य घटना - डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत


आज रक्षा बंधनानिमित्त हा प्रसंग आपणा सर्वांसाठी.

             श्री. कल्याणगड ते श्री सज्जनगड मोहिम १ फेब्रुवारी १९९६ ते ४ फेब्रुवारी १९९६ या कालावधीत घडलेली सत्य घटना आहे. आणि ही वाचल्यावर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आज राखी पौर्णिमा अर्थात रक्षा बंधन आहे. आज बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि माझी रक्षा कर असे मनोकामना बोलत असते. रक्षा बंधयानिमित्ताने भाऊराया बहिणीला साडी चोळी भेट म्हणून देत असतो. हा एक धार्मिक आणि पारंपरिक हिंदू सण आहे. तो प्रत्येक हिंदू आनंदाने साजरा करत असतो. अशाच सणामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा जतन आणि संवर्धन होत आहे. आणि नाते संबंध आणि एकत्र कुटुंब व्यवस्था वृद्धिंगत होत असतात.


संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या भगिनी 

चला तर वाचू या सविस्तर सत्य घटना - 

              गेली ४ दिवस अतोनात कष्ट आणि परिश्रमाने दमलेले ७५ हजार धारकरी सह्याद्रीचे दारीडोंगर, नद्या नाले तुडवत सज्जनगडावर पोहचली. गेल्या ४ दिवसात प्रथमच दुकाने दिसली त्यामुळे सर्व धारकरी मंडळी गडावर चांगलीच रुळली. भिडे गुरुजी यांनी या मोहिमेत फक्त ३ वेळच जेवण जेवले होते. त्यांच्या अनवाणी पायांना भेगा पडून रक्त वाहत होते. काही निष्ठावंत धारकर्यानी त्या जखम कपड्याने बांधल्या होत्या.

गडकोट मोहिमेत माता भगिनी गुरुजींना ओवाळताना

       सज्जनगडावर त्या दिवशी योगायोग घडला. गुरुजींची सख्खी बहिण जी सध्या परदेशात स्थायिक आहे, ती खास गुरुजींना भेटायला पुण्याहून त्या गडावर आदल्या दिवशीच आल्या होत्या. २५ वर्षानंतर एक बहिण एका भावाला भेटणार होती. गड्यानो विचार करा, आपण मोहिमेला ४ दिवस जातो तरी बायकोला २०-२५ वेळा फोन करतो. ती बहिण तिचे डोळे फक्त आपल्या गुरुजींना भेटायला आतुरले होते. ध्यानी, मनी आणि स्वप्नी फक्त राष्ट्रकार्य असणारे आमचे श्री. संभाजी भिडे गुरुजी,२५ वर्षानंतर वैयक्तिक नातलगांना भेटणार होते. 

 श्री.संभाजी भिडे गुरुजी

               गुरुजी गडावर आले, अगोदर गडावर आलेल्या धारकर्यांना त्या गुरुजींच्या भगिनी भेटल्या आणि चर्चा केली. मग धारकरी त्यांना घेवून गुरुजींच्या जवळ गेले. त्या भगिनींनी गुरुजींना पहिले. २५ वर्षानंतर सख्खा भाऊ भेटतोय. त्या भगिनींचे डोळे पाणावले होते. त्यांना हुंदका आवरत नव्हता. त्यांनी गुरुजींना मिठीच मारली. गुरुजींनी सुध्दा गळाभेट घेतली. गुरुजी म्हणाले, कशी आहेस, घरचे सर्व कसे आहेत? भगिनी सर्व ठीक आहेत असे म्हणाल्या. गुरुजींनी हात जोडले आणि भराभरा निघून गेले. फक्त १ मिनिटच ते बोलेले. आणि पाठोपाठ दहा हजार धारकर्यांचे पथक गुरुजींच्या मागे गेले. किती मोठा त्याग गड्यानो. आपल्या सख्या बहिनला २५ वर्षानंतर भेटून सुध्दा मायाजालात न अडकता ,आपल्या ध्येयाशी ठाम असणारे आमचे गुरुजी. आणि शब्द संपतात माझे. 


 श्री. संभाजी भिडे गुरुजी


              फक्त देव,देश आणि धर्म कार्य बस. 


अशी करा Setting आणि Youtube चॅनेल हॅक होण्यापासून वाचवा 


      म्हणून मी नेहमी सांगत असतो माझ्या आयुष्यातून गुरुजी वजा केले तर शिल्लक काहीच रहात नाही.
          आदरणीय श्री भिडे गुरूजी आणि त्यांच्या प्रिय भगिनी यांची श्रीसज्जनगड येथे झालेल्या भावपूर्ण भेटीचे माझ्या संग्रहातील छायाचित्र. श्री कल्याणगड ते श्री. सज्जनगड मोहिमेच्या छायाचित्र संग्रहात अचानक सापडले.
संकलन - डॉ. सतीश बापट.

 श्री.संभाजी भिडे गुरुजी आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी

Post a Comment

7 Comments

  1. देव देश आणि धर्म यासाठी समर्पित असणारं व्यक्तिमत्त्व आजच्या युगातील चाणक्य म्हणजे गुरुजी आहेत....!

    कौटुंबिक पातळीवरील हा त्याग अकल्पित आहे
    त्रिवार वंदन

    ReplyDelete
    Replies
    1. खुपच छान पोस्ट, गुरुजी चे निवडक प्रसंग नक्कीच वाचाला आवडतील,खुप छान पोस्ट, असे त्यागी जीवन परत होणे नाही।

      Delete
  2. असाच प्रसंग गुरुजींच्या आईच्या निधना वेळेस सुद्धा घडला होता. तो सुद्धा आम्हाला वाचायला आवडेल🙏अशा करतो की तुम्ही हा प्रसंग लवकरच पोस्ट कराल.🙏🙏

    ReplyDelete
  3. म्हणून तर गुरुजींचा आदर्श आम्हाला दिशादर्शक आहे.

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर

    ReplyDelete
  5. amha dharkryachi vithu mauli guruji

    ReplyDelete

POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH

close